२०११ हे वर्ष खऱ्या अर्थाने एकाच व्यक्तीने गाजवले, ती व्यक्ती म्हणजे अण्णा हजारे. स्वच्छ चारित्र्य, संयम आणि प्रामाणिकपणा या त्रिसूत्रीने त्यांनी देशातील आबालवृद्धांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
'मैं अकेला चलता गया, लोग जुड़ते गये, कारवाँ बनता गया.' या उक्तीप्रमाणे अण्णा हजारे यांनी कोणाची साथ मिळण्याची वाट न पाहता भ्रष्टाचाराचा अंधार करण्यासाठी हाती मशाल घेऊन 'असतो माम् सद्गमय । तमसो माम् जोतिर्गमय।।' म्हणत पुढे सरसावले. दूर
"प्रलोभने तुला, न लोभ दाविती न मोह बंधने, पदास बांधिती विरोध द्वेष वा, तुला न थांबवी न मोह भासतो, गजान्त वैभवी दैन्य सारण्या तुला, सज्ज व्हायचे सदैव सेवका, पुढेच जायचे"
'एक वयोवृद्ध, सरासरीपेक्षाही कमी उंचीचा माणूस आभाळाइतका उंच होऊन विराट रूप धारण करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले.' प्रत्येकाने आपल्या आत डोकावून त्याच्यातील या निद्रिस्त सामर्थ्याला जागे केले, तर आज आपल्या देशाचे चित्र नक्कीच पालटेल, असे तुम्हाला नाही वाटत?
No comments:
Post a Comment