नागपुरी संञा राज्यातच नव्हे तर देश व आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आहे लागवड व्यवस्थापन, वाण, रोपे, यात्रिकीकरण, अन्नद्रव्ये व कीडनाशके व्यवस्थापन आदी अनुषंगाने संत्रा बागेचे एकरी उत्पादन व गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात संत्र्याचे मूल्यवर्धन होण्याच्या दृष्टीने ग्रेडिंग वेक्सिंग अशा पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेचा अभाव होता. अलीकडील काळात त्याबाबत जागरूकता वाढल्याने अमरावती जिल्ह्यात अशा प्रकारचे सुमारे १३ प्रकल्प उभे राहिले आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात तसेच नागपूरच्या कळमेश्वर तालुक्यातही अशा प्रकल्पाची उभारणी झाली आहे. यात फळांचे आकारानुसार 'ग्रेडिंग' होते. वॅक्स कोटिंग केल्यास टिकवणक्षमता वाढीस लागून सरासरी आठ ते दहा दिवसांनी वाढते. फळाची चकाकी, गुणवत्ता सुधारते. अशा फळाला दरही जास्त मिळतो...
* प्रकल्पांविषयी..
वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट हा 'नर्सरी हब' म्हणून ओळखला जातो. कोट्यवधी रुपयांची उलाढाल संत्रा, मोसंबी रोपेविक्रीतून या भागात होते. याच भागात जावेद खान यांनी उभारलेल्या प्रकल्पाची किंमत सुमारे एक कोटी ३२ लाख रुपये असून, मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगातून ५० लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. अशा प्रकल्पांची सरासरी किंमत यादरम्यानच राहते. संयंत्राच्या माध्यमातून एका तासात साडेसात टन फळांचे ग्रेडिंग' व 'वॅक्सिंग' होते. हंगामात २४ तास प्रक्रिया सुरू असते. दिल्ली, कोलकाता भागांत माल पाठविण्यात येतो. सप्टेंबर - डिसेंबर आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत है। उद्योग सुरू असतात, एका उद्योजकाकडे पाच महिन्यांच्या हंगामात सरासरी पाच हजार टनांवर प्रक्रिया होते. त्यात आंबिया बहरातील तीन ते साडेतीन हजार टन फळांचा समावेश आहे.
* वॅक्सचा वापर *
'इडिबल व्हेजिटेबल वॅक्स चा वापर फळांच्या आच्छादनासाठी (कोटिंग)) होतो. ३५० रुपये प्रति लिटर त्याचा दर आहे. एक टन संत्र्यासाठी एक लिटर बॅक्सची गरज राहते असे सालबर्डी येथील उद्योजक नीलेश रोडे सांगतात. अन्य देशांतून ते आयात केले जाते.
* बांगला देशात पाठवणी * बांगला देश हा नागपुरी संत्र्याचा मोठा आयातदार आहे. जावेद खान आपल्या प्रकल्पातील संत्र्याची निर्यात बांगलादेशात करतात. देशाच्या सीमेपर्यंत संत्रा पाठविला जातो. यासाठी वाहतुकीवर सुमार दीड लाख रुपये खर्च होतो. त्या ठिकाणी त्या देशातील व्यापारी आपल्या ट्रकमध्ये माल 'लोड' करून घेतात. नागपुरी संत्र्यावर बांगला देशाकडून गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन लाख रुपये आयात शुल्क अधिक आकारले जात आहे. परिणामी, नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. एका ट्रकमध्ये सरासरी २७ टन माल राहतो. आता निर्यातदार अन्य देशांचाही पर्याय शोधत आहेत.
* निर्यातदारांची मदत *
बांगला देशात जावेद खान यांच्याकडील संत्र्याला प्रति क्रेट उच्चांकी तीन हजार ते साडेतीन हजार रुपये दर मिळाला आहे. त्याच वेळी अन्य व्यापाऱ्यांच्या संत्र्याला हा दर २५०० ते तीन हजार रुपये मिळाला, बांगला देशात थेट निर्यात केल्यास त्या भागातील खरेदीदारांकडून अनेकदा पैसे न देण्याचे अनुभव आले आहेत. अशा व्यवहारात एलसी. (लेटर ऑफ क्रेडिट) मिळण्यात अडचणीत येतात. परिणामी, अनेक उद्योजक थेट बांगला देशाला संत्रा पाठविण्याऐवजी कोलकात्यातील निर्यातदारांशी व्यवहार करतात. मग हे व्यापारी बांगला देशातील व्यापाऱ्यांशी संपर्क साधतात. अशी मध्यस्थीने निर्यात होते.
* शेतकऱ्यांकडून फळांची खरेदी *
ग्रेडिंग, कोटिंग सुविधेमुळे देशातील मोठ्या सुपर मार्केट उद्योगातील डझनभर कंपन्या अमरावती भागातून संत्रा खरेदी करतात. यात केवळ पाच टक्के शेतकरी आपल्या फळावर प्रक्रिया करून थेट कंपन्यांना विक्री करतात. उर्वरित शेतकरी व्यापाऱ्यांनाच विक्री करतात.
■ क्रेटचा वापर
देशांतर्गत व देशाबाहेर संत्रा पाठविण्यासाठी एकदाच वापरात येणाऱ्या (वनटाइम यूज) क्रेटचा देखील उपयोग वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी क्रेट तयार करणाऱ्या प्रकल्पांचीही उभारणी केली आहे. अमरावती जिल्ह्यात अमरावती जिल्ह्यात असे सुमारे १२ कारखाने सुरू असून, नव्याने पाच प्रकल्प प्रस्तावित आहेत. पूर्वी लाकडी बॉक्सचा उपयोग पॅकिंगसाठी व्हायचा. त्यामुळे वृक्षांची तोड व्हायची. आता प्लॅस्टिक क्रेटचा उपयोग वाढीस लागल्याने तोड थांबण्यास मदत झाली आहे. क्रेट तयार करण्याची यंत्रणा सुमारे एक कोटी १८ लाख रुपयांची आहे. सुमारे २४ तासांत १८०० क्रेट्स तयार होतात. प्रति क्रेटला सरासरी दीड किलो कच्चा माल लागतो. कमी खर्चाचा क्रेट असावा अशी मागणी राहते. त्यादृष्टीने निर्मिती होत असल्याचे क्रेट उत्पादक आदित्य लेकुरवाळे सांगतात.
No comments:
Post a Comment