Monday, 5 December 2022

माझे मनोगत

वडिलांच्या निधनानंतर सर्व घरची जबाबदारी माझ्यावर येवून पडली. परंतू यामध्ये माझ्या मधल्या बहिणीने व आईने ती सर्व जबाबदारी स्वतःच्या खांदयावर घेतली आणि मला सांगितलं की, तू फक्त शिक आणि मोठा हो.                             यामुळेच आज हे यश मला मिळाले आहे 

माझे नाव विवेक उद्धवराव गोलर. मी क यवतमाळ जिल्ह्यातील मुली या छोट्याशा अ गावात राहतो. माझं १ ते ७ वी पर्यंत शिक्षण क जि.प.शाळा, मुर्ती येथे झाले. तर ८ वी ते १२ व बी.ए., एम.ए. घाटंजी येथे मराठी व माध्यमातून झाले. घरची परिस्थिती बेताची अ असल्याने मला सेमी इंग्रजी मध्ये प्रवेश घेता आला नाही. कारण तेव्हा असा समज होता की सेमी इंग्रजी मध्ये ट्युशन लावावी लागते. पण त्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते

       माझे १० वी नंतरचं शिक्षण मी स्वतः पार्ट टाईम जॉब करून केलं. १० वी नंतर मी. सलग ३ वर्षे उन्हाळी व दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कपड्यांच्या दुकानात जॉब केला. १२ वी मध्ये मी ठरवलं होत की, मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार. कारण इंजिनिअरिंग, लॉ अॅग्री इ. करता खर्च करण्याची आमची ऐपत नव्हती. म्हणून मी १२ वी नंतर डी.टी.एड्., व मुक्त विद्यापीठातून बी.ए. केलं आणि सोबतच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.


सन २०१४ मध्ये मी स्पर्धा परीक्षेला सुरुवात केली. त्याकरिता मी व माझे दोन मित्र यवतमाळ येथे रुम करुन राहू लागलो. यवतमाळला रुम करणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. कारण आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची व माझी मधली बहिण दवाखान्यात जॉब करायची. मला दर महिन्याला १५००/- रु. मिळायचे. १०००/- रु. रुम भाडे व ५००/- रु. जेवणासाठी. एवढ्या पैशात मला महिना काढावा लागायचा. महिन्याच्या   २५ तारखेनंतर मनात न व्हायचं की, या महिन्यात मला पैसे भेटणार की नाही. पण माझ्या मित्रांनी व आजपर्यंत मला सहवासात भेटलेल्या सर्व लोकांनी मला सांभाळून घेतलं, याच वर्षी मे २०१४ ला माझा बी.ए. चा शेवटचा पेपर झाला आणि लगेच आम्ही रुमवर परत आलो. दुसऱ्या दिवशी सकाळी ५.०० वा. घरून फोन आला की, माझे वडिल वारले म्हणून ! मी पुर्णतः भिन झालो होतो. मला काहीच सुचत नव्हतं. परंतु अशा परिस्थितीत माझ्या मित्रांनी मला सांभाळून घेतलं. मला वाटल होत की, आता सर्व संपलं. कारण सर्व घरची जबाबदारी माझ्यावर येवून पडली. परंतू यामध्ये माझ्या मधल्या बहिणीने व आईने ती सर्व जबाबदारी स्वतःच्या खांदयावर घेतली आणि मला सांगितलं की, तू फक्त शिक आणि मोठा हो... माझ्या आजीनेसुध्दा देवाघरी जाताना  हेच वाक्य म्हटल होतं                   यवतमाळ मध्ये आल्यावर मी  १ वर्ष ईपिंग सेंटरला जॉब केला आणि स्पर्धा दीक्षेचा अभ्यास केला. सुरुवातीला आम्हा ला कोणत्या पदासाठी अभ्यास मी करायचा हेच माहित नव्हतं. सा आम्ही आमच्या रुमपरचं अभ्यास करायचो. काण अभ्यासिकेची फी मला २. परवडणारी नव्हती. एक दिवस असा आला डी की, आमच्या गावाकडील आमचे मित्रांमुळे श्री आमची ओळख ज्ञानज्योती एज्युकेशन, पुणे/नागपूर/ यवतमाळ चे संस्थापक, अध्यक्ष श्री. विशाला भेटूरकर सर यांच्याशी झाली. त्या ष्ण दिवसापासून आमच्या जीवनाला कलाटणी मिळाली त्या दिवसापासून सरांना व त्यांच्या जीवन प्रवासाला समजण्याचा प्रयत्न करत आहोत .परंतु  अजूनही  मला ते जमलं नाही कारण सरांचा जीवनप्रवास समुद्रासारखा खोल आहे. सरांच्या संस्थेतील कमवा आणि 4 शिका... या योजनेसंबंधी जेव्हा मला कळले. मी सलग ३ वर्षे ज्ञानज्योती यवतमाळ शाखा येथे रोज ५ तास असे काम केले. या योजनेचा माझ्यासारखा गरिब विद्यार्थ्याला खूप नं. फायदा झाला. तसेच यवतमाळ येथे तेव्हा या राज्यसेवेचे क्लास कोणीही घेत नव्हते. वर त्याकरिता पुणे येथे जाण्याशिवाय पर्याय ०० नव्हता. परंतु श्री भेदुरकर सरांची राज्यसेवेचे ले क्लास, यवतमाळ येथे सर्वात प्रथम उपलब्ध ला करून दिले. या क्लामध्ये मला श्री. रमण सर त यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. रमण सर हे ब्ला आमचे सर्वांचे फक्त सरच नव्हते तर जीवलग सर्व मित्र होते. आजही रमणसर सोबत जिव्हाळा रंतू टिकून आहे.


ती ज्ञानज्योती एज्युकेशन, यवतमाळ येथे ली असताना मी एम.पी.एस.सी. च्या ग्रुप अ, ब, क णि या सर्वांच्या परीक्षा देत असायचो. श्री. भेदरकर सर व रमण सर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे कशा पध्दतीने, कमी वेळात सोडवायची आणि एखादा प्रश्न येत नसेल तर तो कसा सोडवायचा याची परिपूर्ण तयारी त्यांनी आमच्या करुन घेतली होती. त्यामुळे मी ग्रुप व व ग्रुप क च्या मेन परीक्षेला पात्र झालो होतो. जेव्हा एम.पी.एस.सी. च्या परीक्षा असायच्या. तेव्हा मी भेदूरकर सर व तारमण सर सराव पेपर घ्यायचो आणि सोबत त्या ना पेपरच्या संकल्पना ते समजावून सांगायचे.


के श्री. भेदकर सर यवतमाळ येथे वित्त व न. लेखाधिकारी या पदावर कार्यरत असून सुध्दा रोज आमच्याकरिता वेळ काढायचे आणि न्या आमच्या अडचणीचे निरसन करायचे. एकदा काय झालं की, माझी राज्यसेवेची पूर्व परीक्षेचा या रिझल्ट ५ मार्कस्ने राहिला. त्यामुळे मी खूप त चलबिचल झालो होतो. माझ्या मनात विचार यायला लागले की, हे माझ्याकडून होणार नाही. माझ्या कुटुंबाचे स्वप्न मी पूर्ण करु शकणार नाही. या विचारांनी मी माझ्या दोन्ही मित्रांपासून दूर राहू लागलो. त्यांच्याशी नीट बोलत नव्हतो, तेव्हा मी माझ्या मित्रांना म्हटलं की, आपल्याला श्री. भेदूरकर सरांना भेटायला आताच जायचं आहे. तेव्हा सकाळचे ८.०० वाजले होते. मी सरांना फोन लावला आणि म्हटलं की, मला तुम्हाला भेटून बोलायचे आहे तेव्हा सरांनी मला सरल न घरीच बोलावलं तेव्हा तेव्हा सरांनी माझी दशा व व्यथा पाहून एकच गोष्ट सांगितली की, जेव्हा आपण प्रगतीपथावर जात नसतो, मध्येच थांबतो तेव्हा आपण नेहमी खाली येत असतो. त्यामुळे आपण नेहमी चालत राहायचं. यश केव्हा मिळेल हे आपल्या हातात नाही. आपलं फक्त ही. चालत रहायचं. या प्रवासात लोकांच्या ल अपेक्षांचे ओझं घ्यायचं नाही. त्यांच्याकडे णि दुर्लक्ष करायचं आणि माणसं जोडत जायचं.      त्या दिवसापासून मी आजपर्यंत सरांच्या या शब्दांचा ध्वनी आजही माझ्या कानात गंजत आहे. आजही सर चालत आहेत आणि मी सुध्दा त्यांच्याप्रमाणेच चालत राहण्याचा संकल्प केला आणि तो चालूच आहे. श्री. भेदूरकर सर व रमण सर आणि यासोबत माझे कुटुंब व माझे जिवलग दोन मित्र यांच्या आधाराने मी दिवाणी व फौजदारी न्यायालय, दिग्रस येथे कार्यरत आहे. माझा हा प्रवास अजूनही संपलेला नाही. सरांच्या मार्गदर्शनाखाली माझा अभ्यास अजूनही चालू आहे.


स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या सर्व विद्याथ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, जीवनात एक सरांसारखा मार्गदर्शक हवा, आधार देणारे मित्र असावे आणि कुटुंबाचा निरंतर विश्वास असावा, कारण स्पर्धा परीक्षा ही कसोटी क्रिकेट सारखी आहे. टी-२० सारखी नाही.


त्या दिवसापासून मी आजपर्यंत सरांच्या या शब्दांचा ध्वनी आजही माझ्या कानात या गुजत आहे. आजही सर चालत आहेत आणि चूप मी सुध्दा त्यांच्याप्रमाणेच चालत राहण्याचा हा संकल्प केला आणि तो चालूच आहे. श्री. ते भेदरकर सर व रमण सर आणि यासोबत माझे कुटुंब व माझे जिवलग दोन मित्र यांच्या आधाराने मी दिवाणी व फौजदारी न्यायालय, ब्ध दिग्रस येथे कार्यरत आहे. माझा हा प्रवास सर अजूनही संपलेला नाही. सरांच्या हे मार्गदर्शनाखाली माझा अभ्यास अजूनही चालू लग आहे.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...