Thursday, 15 December 2022

मोबाईल फोन व आपण

मोबाईल फोन आणि आपण मोबाईल फोन उपकरण ही तुमच्यासाठी व महत्त्वाची वस्तू आहे. ती जपून वापरा. त्याची योग्य काळजी घ्या. • मोबाईल फोन उपकरणावर धूळ बसलेली असते. अनेक सूक्ष्म जीवजंतूंनी त्यावर घर केलेले असू शकते. त्यामुळे तो नित्यनेमाने स्वच्छ करा. मऊ फडक्याने किंवा टिश्यू पेपरने रोजच्या रोज पुसा. त्याला पाणी लावू नका, पण जरा दमट फडक्याने पुसला तरी चालू शकतो. पण त्यावर पाणी राहू देऊ नका. • मोबाईल फोन उपकरण शक्यतो कापडी, प्लास्टिकच्या किंवा चामडी कव्हरमध्ये ठेवा. त्यामुळे त्याला धक्का कमी नागतो आणि त्यावर घाण कमी बसते. ● मोबाईल फोन उपकरण हे खेळणे • नाही. ते उगाच कुठेतरी आपटत राहणे, र झेलत राहणे, त्याच्याशी चाळे करणे, यामुळे त्याचे आयुष्य कमी होते. • मोबाईल फोनची बॅटरी चार्ज करताना उपकरण बंद ठेवणे इष्ट. बॅटरी ठराविक वेळी, ठराविक कालावधीसाठी चार्ज करत ठेवा. किती वेळा, किती वेळासाठी हे तुमच्या उपकरणाच्या गरजेनुसार ठरवा. • खाताना, पावसातून चालताना मोबाईल फोन उपकरण शक्यतो वापरू नका. • पेट्रोल पंपावर किंवा अति उष्णता असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन उपकरण वापरू नका. • कानाला हेडफोन लावून गर्दीच्या रस्त्यात चालणे किंवा रस्ता ओलांडणे टाळा. • आपले मोबाईल फोन उपकरण अन्य कोणाच्या हातात देताना जरा विचार करा. त्यात कितीतरी महत्त्वाचा डेटा असू शकतो. • सार्वजनिक वाहनाने म्हणजे बस, ट्रेनने प्रवास करताना आपल्या बोलण्याचा त्रास आजूबाजूच्यांना होत नाही ना, याकडे लक्ष द्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी फोनवरून खाजगी संभाषण करताना सावध राहा. कुणी आपले बोलणे ऐकतेय का, ते टेप करतेय का, याबाबत जागरूक राहा. भान हरपून मोबाईलवर बोलत राहणे टाळा. • रात्री झोपताना मोबाईल फोन जवळ ठेवू नये. अलार्म लावण्यासाठी घड्याळ वापरता येते.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...