Saturday, 17 December 2022

उद्याची अर्थसृष्टी असाध्याची साधना

रातोरात श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणारा माणूस एक तर भाबडा असतो नाही तर भामटा असतो. पण उज्वल भवितव्याचे स्वप्न पाहणे हे मनुष्य स्वभावाच्या उमदेपणाचे लक्षण आहे. रोजचा दिवस रोज उगवतो आणि उद्याचा दिवस रोज पुढेपुढे पळती. त्यामुळे उज्ज्वल भवितव्य कधी येणार हे रोज पडणारे स्वप्न राहते. निदान सामान्य माणसांच्या बाबतीत हे घडत राहते. बचत बचत अशी किती करायची ? आजच्या गरजा भागवून काही शिल्लक राहिले तर ती बचत. त्या बचतीला महागाईची कीड लागण्यापासून कसे वाचवायचे, हा प्रश्न नेहमीच आ वासून उभा असतो. असे म्हणतात की नकारात्मक विचारांनी केवळ नकार घंटेचाच गजर होत राहतो. पण सकारात्मक विचार करायचा असेल तर खोलात शिरावेच लागते. सामान्य माणसाला अर्थसृष्टी एखाद्या मृगजळासारखी भासते. पण दूरवर खरे तर एक सरोवर आहे, तिथे नंदनवन नसले तरी आनंदवन असू शकते.गुंतवणुकीसंबंधी काही मिथ्यांचा आणि तथ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मिथ्य : शेअर बाजार हा सट्टेबाजांचा अड्डा आहे. तिकडे फिरकणे म्हणजे | दिवाळखोरीला निमंत्रण आहे. तथ्य : शेअर बाजार पारदर्शक नियमांनुसार चालणारी एक संस्था आहे, जिथे ग्राहकाला एखाद्या एखाद्या उद्योगाच्या मालकीचा काही भाग विकत घेता येतो किंवा आपल्याकडील एखादा भाग विकता येतो. कुठलाही उद्योग चालण्यासाठी दोन प्रकारच्या भांडवलाची आवश्यकता असते. एक म्हणजे भागभांडवल (शेअर्स) आणि दुसरे म्हणजे कर्जभांडवल (लोन अथवा डेब्ट). कर्जभांडवलाचे मूल्य व्याजाच्या दरानुसार ठरते तर भागभांडवलाचे मूल्य त्या उद्योगाच्या नफा कमावण्याच्या क्षमतेवर ठरते. आपण विनाकारण नफा कमावण्याकडे संशयाने तर व्याज कमावण्याकडे आदराने पाहतो. वास्तविक पाहता कर्जाची परतफेड आणि व्याजाची फेड त्या त्या उद्योगाने कमावलेल्या | नफ्यातूनच होते. त्याचप्रमाणे शेअर गुंतवणुकीतील परतावा त्या उद्योगाने कमावलेल्या नफ्यातूनच मिळतो. फरक एवढाच की व्याजामध्ये एक व्याज मध्ये एक पकार करारपञातुन येणारी निश्रिती नसते तथ्य ही एक भाबडी समजूत आहे. बँकेत ठेव ठेवणे म्हणजे आपण बँकेला कर्ज देणे होय. बँकेत ठेव ठेवणे हा तात्पुरत्या गरज भागविण्याच्या दृष्टीने श्रेयस्कर उपाय आहे. पण त्यातून भांडवल संचय होईल असे आपण समजून चालता कामा नये. एकतर सतत होणाऱ्या भाववाढीमुळे बरेचसे व्याज आणि आपल्या देशाच्या बाबतीत मुद्दलाचा काही भाग यांचासुद्धा क्षय होतो. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गरजा भागविण्यासाठी बँकेत ठेव ठेवणे अपुरे आहे. मिथ्य: सोने घेऊन ठेवावे. त्यासारखी टिकाऊ गुंतवणूक नाही. तथ्य : सोने टिकाऊ आहे हे खरे आहे पण गुंतवणूक म्हणून फारसे उपयुक्त नाही. सोने हा एक अनुत्पादक बचतीचा प्रकार आहे. दागिना म्हणून ठेवले तर घडणावळ, मोडणावळ, लॉकरचा खर्च आणि | चोरीची भीती यासाठी तयार असावे लागते. अडचणीला वापरावे म्हटले तर असेल त्या भावाला आणि भरवशाच्या सोनाराला विकावे लागते, नाहीतर मारवाड्याकडे गहाण ठेवून अवाजवी व्याजाने पैसे उचलावे लागतात. गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून म्युच्युअल फंडांच्या काही युनिट स्कीम्सचा विचार करणे शक्य आहे. पण सोने घेऊन भविष्य निर्वाहाची योजना बनविता येणार नाही.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...