Sunday, 11 December 2022
कठोर परिश्रम घेतले तरच, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालते.
नमस्कार
मी अर्चना चव्हाण इगतपुरी तालुक्यातील शेवगेडांग या छोट्याशा गावातील रहिवासी माझी लहानपणापासून आणि कुटुंबियांनी पण इच्छा होती की शासकीय सेवेत रुजू व्हावे आणि त्यात शासकीय सेवा म्हणजे पोलीस होण्याचे
मी माझे विद्यालयीन शिक्षण पूर्ण केले पोलीस भरतीची सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देणारे संस्था कोणती याबद्दल मी शोध घेत होते अशातच मला नाशिक ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असणान्या आरती दामले यांच्याकडून अग्नि अकेडमी बद्दल माहिती मिळाली व क्षणाचा विलंब न करता अग्निपंख अकॅडमी मध्ये Enquiry ला गेले असता तिथे संचालक मा श्री गणेश धुमाळ सर यांनी मला योग्य असे मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या शंकाचे निरसन झाले असता माझा अग्निपंख मध्ये प्रवेश निश्चित केला.
परंतु मला एका अडचणीला सामोरे जावे लागले कारण दररोज इगतपुरी होऊन अॅकडमीला वेळेत येण्या जाण्याचे साधन उपलब्ध होत नसे अशा परिस्थितीत मी खूप ताश झाले होते परंतु सरांनी मला होस्टेलला राहण्याचे सुचविले असता मी तिथे राहण्याचा निर्णय घेऊन मी माझ्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करायला सुरुवात केली.
परंतु काही कालावधीतच पोलीस भरती 2019 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि अशातच महाराष्ट्रात प्रस्थिती आणि त्यानंतर कोरोना सारख्या जागतिक महाभरकर महामारीने सर्व प्रकारच्या भरती प्रक्रिया रखडल्या गेल्या अशा परिस्थितीतही मी जिद न सोडता होस्टेलवर राहुन नियमित अभ्यास सुरू ठेवला अभ्यासात येणाऱ्या प्रत्येक शंकाचे निरसन सरांनी वेळोवेळी केली.
दोन वर्षानंतर कोरोना परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर 2021 मध्ये पोलीस व अन्य भरती सेवा चालू करण्याचा शासनाने निर्णय घेतला असता मला खूप आनंद झाला.
अशा वेळेस मी माझ्या मेहनतीचा वेग दुप्पट केला आणि माझ्या परिश्रमाला दुहेरी रूश मिळाले मी नंदुरबार शहर पोलीस साठी आणि नवी मुंबई चालक या दोन्ही ठिकाणी यश संपादन केले. सरांनी मला जे काही मार्गदर्शन केले हे अत्यंत मोलाचे होते त्यांच्या
या मार्गदर्शनानेच मी हे यश संपादन करू शकले माझ्या यशात माझे सर्व माझ्या कुटुंबियांचे खूप मोठे सहकार्य लाभले. आज अग्निपंख अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन माझ्या जीवनाचे सार्थक झाले सरांच्या मार्गदर्शनाने असंख्य विद्यार्थी विविध पदावर आपले यश आजगावून बसले आहेत यापुढे असेच कायम निरंतर विद्यार्थी वश संपादन करीत राहतील.
मी पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणान्या मुला मुलींना एवढेच सांगू इच्छिते की.....
कदा प्रयत्न तर करा
आकाशी उंच उडण्याचा. सुरवातीला येईल अनुभव
अधून मधून पडण्याचा मग करा स्वतःला निर्भीड ध्यास धरा मागे न सरण्याचा!!
ते पडणेच देईल कानमंत्र ध्येयासाठी जगण्याचा,
यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत व त्याचबरोबर योग्य अशा मार्गदर्शनाची गरज असते.
मला अग्निपंख अकॅडमी सारख्या सुसज्ज असे व्यासपीठ लाभले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. कठोर परिश्रम घेतले तरच यश तुमच्या पायाशी लोटांगण चालते धन्यवाद!
Subscribe to:
Post Comments (Atom)
कङवा सच
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...
-
Privacy Policy for marathi yashogatha news s At Marathi yeshogatha news , accessible from https://marathiyashogathanews.blogspot.com/?m=1, ...
-
Our Introduction Marathi yashogatha news is a [company_purpose] that helps [audience_type] [service_action]. Who We Are Our dedicated team o...

No comments:
Post a Comment