मित्र हो, परिस्थिती ही वेळेची कसोटी असते. तो काळानुरूप बदलत असते. परिस्थिती माणसाला बगायला शिकवते. लढायला शिकवते वेळ पडली तर भांडायला सुद्धा शिकवते आपण सामान्य कुटुंबात जन्मलो म्हणून संघर्ष आपल्या जीवनी सतत खेळत असतो. आयुष्यात जीवनाचे दुसरे नाव संघर्ष आहे. येथे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला संघर्ष हा करावाच लागतो. प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे संघर्ष हा त्याचा भूतकाळ असतो. संघर्ष म्हणजे कसोटीचा काळ, सुखाच्या दिवसात आपल्या सोबत सारेच असतात. दुःखात साथी भावनीक सादही कोणाची नसते. असे म्हणतात एकमेकाचे दुःख एकमेकाशी बोलल्याने हलके होते. सध्याच्या धावपळीच्या जगात कोणालाही कोणी समजून घेण्यासाठी तयार नाही. काही व्यक्तींना तर स्वतः साठी सुद्धा जास्त वेळ नसतो. तर ते इतरांना काय बोलणार, इतरांचे दुःख काय समजणार. प्रत्येक व्यक्ती हा स्वतः मध्ये व्यस्त आहे. जो तो आपल्याच धुंदीत जगत आहे. पण आपण एक गोष्ट विसरतो की कधीकाळी आपण हि या परिस्थितीतून गेलेलो असतो. त्याचा फायदा इतर कुणाचे दुःख सोडवण्यासाठी झाला तर त्याचे कौतुक होईल, त्यामुळे कोणाच्या परिस्थितीला हसत बसण्यापेक्षा त्या परिस्थितीला सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
सुख में हर कोई साथ होता है! संघर्ष में आदमी अकेला होता है। परिस्थितीची जाणीव करून देणारे उत्तम उदाहरण. असे की, पावसाचे दिवस असतात मेघगर्जनेसह पावसाची जोरात सुरूवात चालू असते. अशा प्रसंगी जंगलातील सर्वात पक्षी, हे आपला बचाव करण्यासाठी पावसापासून आपले संरक्षण करण्यासाठी करण्यासाठी स्वतः आसरा शोधत असतात. त्याच पावसात गड हा एकमेव पक्षी असा आहे. ज्या ढगांमधून पाऊस ओसरत असतो. त्याच ढगांच्या वर जाऊन उडत असतो. पाऊस थांबवण्यासाठी धडपडत असतो. सांगायचे तात्पर्य एवढेच की परिस्थितीला घाबरून सोडून जाऊ नका. आपले पाय घट्ट जमिनीत रोवून आलेल्या परिस्थितीचा सामना हा धैवाने करायला शिका. जी परिस्थिती आहे ती प्रामाणिकपणे स्वीकार करा. जन्मणारा प्रत्येक व्यक्ती हा जन्मापासून गरीब किंवा श्रीमंत नसतो.
तुम्ही गरीब म्हणून जन्माला आला ही तुमची चूक नाही .. परंतु तुम्ही गरीब म्हणून मरणार ही तुमची चूक आहे.....
प्रत्येक वेळी परिस्थितीला दोष देत बसू नका. जगात अशा काही व्यक्तींनी परिस्थितीवर मात केलेली आहे. त्यांची परिस्थिती एकदम हलाखीची होती त्यांनी स्वतः यशाचे शिखर गाठले आहे. जर ते करू शकतात, तर आपण का नाही.
आपल्या यशात परिस्थिती ही अडचण असू शकत नाही. परिस्थितीला सावरण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय असतात. वेळप्रसंगी एकमेकांना
सहाय्य करा आणि आलेल्या परिस्थितीला हसत
वेळेत सामोरे जा !!!! https://marathiyashogathanews.blogspot.com/2022/12/blog-post.html?m=1
No comments:
Post a Comment