Tuesday, 6 December 2022

सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणेचा वापर

*  सूक्ष्म सिंचनामध्ये स्वयंचलित यंत्रणेचा वापर *


सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत आणि पीक उत्पादनात वाढ सूक्ष्म शक्य आहे. प्रचलित ठिबक सिंचनामध्ये जरी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत खुप फायदे असले, तरी त्यात नवीन बदल होत आहेत. यातील तंत्रज्ञान समजून घेऊन अवलंब करणे फायदेशीर ठरते.

  ठिबक सिंचनामध्ये पीसीएनडी हे नवीन तंत्रज्ञान आहे. सामान्य ठिबक यंत्रणेमध्ये ठिबक नलिका आणि सबमेन या ठिबक यंत्रणा बंद केल्यानंतर रिकाम्या होतात. ठिबक यंत्रणा पुन्हा सुरू केल्यानंतर त्यातील नलिका व सबमेन पूर्णपणे भरण्यासाठी आणि आवश्यक तो दाब प्रस्थापित होण्यासाठी काही कालावधी लागतो. या कालावधीत काही झाडांना पाणी मिळते तर काहींना मिळत नाही. सामान्य ठिबक सिंचन यंत्रणेद्वारे ९० टक्क्यांपेक्षा जास्त समानतेने पाणी देणे अपेक्षित असते. ही समानता यंत्रणेत पूर्णपणे पाणी भरल्यावर आणि आवश्यक दाब प्रस्थापित झाल्यानंतर प्रत्यक्षात येते. तोपर्यंत पिकांना पाण्याचे असमान वितरण होते. अशीच असमानता ठिबक यंत्रणेतील व्हॉल्व्ह बंद -केल्यानंतर पुन्हा दिसून येते. यासाठी पीसीएनडी यंत्रणेचा वापर महत्त्वाचा ठरतो.


 * पीसीएनडी यंत्रणेचा वापर *


• पाणीपुरवठ्यामध्ये असमानता होऊ नये, म्हणून पीसीएनडी (PCND) यंत्रणा ठिबक सिंचनामध्ये उपलब्ध आहे.


● या यंत्रणेत ड्रीपरमध्ये पीसी (Pressure Compensating) आणि एनडी (Non Drain) अशा दोन यंत्रणा असतात. पीसी यंत्रणेमुळे ठिबक सिंचनाद्वारे शेतातील सर्व पिकांना एकसमान पाणी मिळते.


• व्हॉल्व्हपासून झाडाचे अंतर, पाण्याची लॅटरल व पीव्हीसी पाइपच्या अंतर्गत पृष्ठभागावर होणारे घर्षण (दाबाचा -हास) व कमी होणाऱ्या दाबामुळे तसेच शेतातील चढ-उतारामुळे पडणाऱ्या दाबामुळे ठिबक सिंचन यंत्रणेत झाडाला दिल्या जाणाऱ्या पाण्यात फरक पडतो. हा फरक पीसी यंत्रणेत होत नाही. कारण पीसी यंत्रणेतील विशिष्ट तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रणा साधारणपणे १ किलो प्रति सें.मी. वर्ग ते ४ किलो प्रति सें.मी. वर्ग इतक्या मोठ्या दाबातील फरकाला सुद्धा एकसमान पाणी देते.


• एनडी या घटकामुळे ठिबक यंत्रणेत जेव्हा दाब नसतो, तेव्हा यंत्रणा कार्यरत होऊन ड्रीपरला बंद करायचे काम करते. जोपर्यंत ठिबक ठिबक यंत्रणेत दाब तयार होत नाही, तोपर्यंत लॅटरल व सबमेनमध्ये पाणी तुंबून ठेवले जाते. पुन्हा जेव्हा पंप व व्हॉल्व्ह सुरू केले जातात आणि ठिबक यंत्रणेत दाब निर्माण होतो, तेव्हा ड्रीपरमधून पाणी पुन्हा पडण्यास सुरुवात होते. ठिबक यंत्रणा बंद केल्यानंतरही त्यामध्ये पाणी भरून ठेवले जाते. जेव्हा यंत्रणा पुन्हा सुरू केली जाईल त्या •वेळी तत्काळ पाणी पूर्ण प्रवाहाने येऊन सर्व पिकास एकसमान पाणी मिळण्यास सुरुवात होते.


 * स्वयंचलित यंत्रणा फायदेशीर * 


ठिबक यंत्रणेत वीज उपलब्धतेची अनियमितता तसेच यंत्रणा हाताळताना होणाऱ्या मानवी चुका आणि मर्यादांमुळे ठिबक सिंचन पद्धत वापरात काही त्रुटी राहतात. या त्रुटी दूर करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा हा चांगला पर्याय आहे. बाजारपेठेत विविध प्रकारच्या स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध आहेत.


...अशी आहे यंत्रणा * 


• या यंत्रणेत शेतावर जीएसएम/ जीएसआय संचलित कंट्रोलर बसवले जाते. त्यात एका सिम कार्डच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे मोबाईल किंवा संगणकाद्वारे ठिबक यंत्रणा संचलित करण्यासाठी आवश्यक संदेश पाठविला जातो. हा संदेश एकदा पाठविल्यानंतर पुढे जोपर्यंत तो बदलायची आवश्यकता नसते. तोपर्यंत प्रोग्रॅमच्या स्वरूपात कायम असतो. त्यामुळे नित्यपणे ठिबक यंत्रणा कार्यरत राहते.


• कंट्रोलरद्वारे शेतातील स्वयंचलित व्हॉल्व्ह पंप, खताची यंत्रणा, फिल्टरची स्वच्छता स्वयंचलित पद्धतीने कार्य करतात.


● विद्युत पुरवठा नसल्यास, पाण्याचा स्रोतात पाणी नसल्यामुळे, खताच्या टाकीत खताचे द्रावण नसल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे यंत्रणा सुव्यवस्थित कार्य करू शकत नसेल तर तसा संदेश ई-मेलद्वारे शेतकऱ्यांना पाठविला जातो. • यंत्रणा पाणी आणि खते व्यवस्थित देते की नाही हे शेतकरी मोबाईलमध्ये किंवा संगणकावर पाहू शकतात. पाच वर्षांपर्यंतचा पाणी आणि खते दिल्याचा तपशील शेतकरी कधीही तपासू शकतात. या यंत्रणेत विविध प्रकारचे सेंसर बसविणे शक्य आहे.

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...