Monday, 5 December 2022

एखादे पद मिळाल्यानंतर त्यावर कायम न राहता वरच्या पदाची तयारी केली तर नक्कीच यश मिळते.

 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव राहुल रावसाहेब काळे, माझे


जन्मगांव जवळा, ता. आणि, जि. यवतमाळ हे आहे. माझे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळा येथे झाले. तर इयत्ता ५ वी पासून इयत्ता १२ वी पर्यंतचे शिक्षण कला शाखेत श्री. गुरुदेव विद्यामंदिर जवळा येथे झाले. इ. १२ वी मध्ये कला शाखा असल्याने व ८०% गुण मिळाल्याने डी.एड्. करुन शिक्षण घेण्याचे ठरविले. डी.एड. साठी २००६ साली देवराव पाटील अध्यापक विद्यालय, लोणी येथे प्रवेश घेतला. २००८ मध्ये डी. एड्. पुर्ण करुन शिरपूर या गावी ६ महिने शिक्षक म्हणून इंटरशीप केली. त्याचवेळी शिक्षक होण्यासाठी सी.ईटी. परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे होते. त्यावेळी यवतमाळ येथे रूम करून अभ्यास केला. सी.ईटी परिक्षेस वेळ असल्याने पोस्टल असिस्टंट पदाचा अर्ज भरला व पोस्टल असि. म्हणून यवतमाळ मुख्य डाक येथे नोकरी प्राप्त झाली.           


परंतु मधल्या काळात स्पर्धा 1. परिक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा 5 श्री. भेदुरकर सर यांच्याकडून प्राप्त अभ्यास केला. सन २०११ सालच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रथम प्रयत्नात पास होवून मुलाखतीस पात्र झालो. मात्र अंतिम यादीमध्ये संधी थोडक्यात हुकली. त्यानंतर २०१२ साली राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली.


परंतू मुलाखतीसाठी १ मार्क कमी पडला. २०१२-१३ मध्ये एस.टी.आय. मुख्य परीक्षा दिली. त्यामध्ये कट ऑफ २४३ होता



परिक्षेचा अभ्यास करण्याची प्रेरणा श्री. पेटुरकर सर यांच्याकडून प्राप्त अभ्यास केला. सन २०११ सालच्या राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रथम प्रयत्नात पास होवून मुलाखतीस पात्र झालो. मात्र अंतिम यादीमध्ये संधी थोडक्यात हुकली. त्यानंतर २०१२ साली राज्यसेवा मुख्य परीक्षा दिली.


Selected But Not Recommended.


शेवटी अन्य परीक्षा देण्याचे ठरविले व २०१४ मध्ये NICL क्लार्क, आरोग्य सेवक, लिपीक, धर्मादाय आयुक्त, अधिक्षक धर्मादाय आयुक्त इ. पदावर निवड झाली. त्यापैकी                        अधिक्षक सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर जुलै २०१४ मध्ये भंडारा येथे रुजू झालो. मधल्या काळात एम. ए. समाजशास राज्यशास्त्र पदवीत्तर पदवी पूर्ण केली.


  त्यानंतर सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असताना अभ्यास सुरु होता. त्याचवेळी २०१८ मध्ये सरकारी कामगार अधिकारी वर्ग- २ (राजपत्रीत) म्हणून निवड झाली. नंतर जानेवारी २०१९ मध्ये कामगार उप-आयुक्त कार्यालय अमरावती येथे सरकारी कामगार अधिकारी म्हणून रुजू झालो. एम.एस.डब्लू व एल.एल.बी पूर्ण इंदिरा गांधी मुक्त विद्यापिठ, केले. दिल्ली येथून एम. बी. ए. सुरु आहे.


सर्व अभ्यास विद्याथ्यांना सल्ला देवू इच्छितो की, एखादे पद मिळाल्यानंतर त्यावर कायम न राहता वरच्या 'पदाची तयारी केली तर नक्कीच यश मिळते.                                               धन्यवाद..                                                                    https://marathiyashogathanews.blogspot.com/?m=1

No comments:

Post a Comment

कङवा सच

अगर कोई मंदिर गिर जाए तो घबराने की कोई बात नहीं है। भले ही कोई मस्जिद गिर जाए हां-हमलों के साथ खिलवाड़ करने की जरूरत नहीं है। मंदिर-मस्...